लहान वयात चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, क्रीडांगणापासून दूर राहिलेली मुले, सातत्याने टीव्हीसमोर कार्टून अथवा कॉम्युटरवर गेम खेळण्यात मग्न असणं आणि हे करत असताना हातात काही तर खायला असणं. लहान मुलांच्या अशा सवयींमुळेच हल्ली त्यांच्यात लठ्ठपणा दिसतो, यामुळे लहान मुलांमध्ये चालताना धाप लागणे, दम लागणे, श्वास वाढणे, शकणे, वारंवार भूक लागणे अशी लक्षणे दिसू लागली आहेत.
मुलांमध्येल आलेला हा जाडेपणा आहे का लठ्ठपणा ही आता ओळखायला शिकले पाहिजे. मुले काय खातात, कस्य करतात, किती व्यायाम करतात, किती चालतात बाकडे मुलांच्या लहान वयातच लक्ष दिलं तर बरं. नाही तर ही मुले मोठी झाली की त्यांच्यात आळशीपणा अधिक वाढीला लागतो. बघता बघता त्यांचा पोटाचा घेर सुटायला लागतो. त्याला वेळीच आवरलेले बरे.
लठ्ठपणात अनेक व्याधींचे मूळ आहे. या आजारामुळे अनेक आजारांचा उगम होतो. लठ्ठपणात जेवढे वजन वाढते त्याचा बोजा शरीराच्या अन्य अवयवांवर पडून ते अवयव लवकर निकामी होतात. मुलांसह मोठ्यांमध्ये लठ्ठपणा वाढत जातो तसे त्यांच्या शरीरातील चरबीच्या पेशींमधून रसायने तयार होतात. शरीरातील प्रत्येक हॉर्मोन्स आणि एन्झायमची मातृपेशी ही चरबी आहे. त्या चरचीचे प्रमाण बाढले, की त्या पेशींचे प्रमाण अवास्तव वाढते. शरीरातही एक प्रकरची रासायनिक गुंतागुंत तयार होते.
आता आपण लठ्ठपणाच्या कारणांचा विचार करू… लठ्ठपणा म्हणजे ज्या व्यक्तीच्या शरीरात चरबीचे प्रमाण अधिक असते. दिसायला फार जाड नसलेला माणूस लठ्ठ असू शकतो. त्याला उपचाराची गरज असते, या उलट अतिवजन असलेल्या माणसात चरबीचे प्रमाण अधिक असते असे नाही. परंतु स्नायू, हाडे ही मोठी असू शकतात. काही व्यायामपटू, बेटलिफ्टर्स मांना लठ्ठपणाचा आजार नसल्याने उपचाराची गरज नसते.
लठ्ठपणाची कारणे
- लठ्ठपणाचा आजार हा अनुवंशिक असतो.
- व्यायामाचा अभाव
- बैठे काम
- अधिक उष्मांकाचा आहार मानसिक तणावामुळे लठ्ठपणा येतो.
- थायरॉईड, हार्मोन्सची कमतरता, स्त्रीबीज ग्रंथीचा आजार व त्यामुळे होणारे हार्मोन्सचे असंतुलन,
- काही वेळा वजन वाढण्याचे कारण शोधणे देखील अनघड असते. मानवाच्या उत्क्रांती अवस्थेत, दुष्काळी अवस्थेला तोंड देण्यासाठी शरीरात साठवलेली चरबी ही उर्जे साठी वापरता येण्याची शक्यता अधिक असते. असे असताना जास्त उर्जेचे सेवन झाल्यास पचनसंस्था (metabolism) बिघडून लठ्ठपणा हा आजार होतो. याशिवाय नियमित व्यायामामुळे उर्जेचे वापर होऊन ती साठण्याचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते. तसेच दोन साराळ्या व्यक्ती एकसारखे जेवण घेत असल्या, तरी त्यांचे वजन सारखे वाढत नाही. कारण प्रत्येकाची क्षमता किती बजन पेलू शकेल ही त्याच्या शरीरावर अवलंबून असते. त्यामुळे एकाच घरात जन्मलेल्या अथवा एकसारखे जेवण करत असलेल्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा आजारासारखा दिसत नाही.
लठ्ठपणा करत मोजणार? आंतरराष्ट्रीय संकेतानुसार व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) मोजणे आवश्यक असते. हे बजन आणि उंबीचे सूत्र आहे.
बीएमआय = व्यक्तीचे वजन (किलोग्रॅममध्ये) (g/m2) /व्यक्तीची उची (मीटरमध्ये)
लठ्ठपणा मोजण्याचे उत्तम साधन म्हणजे बीएमआय महिलांच्या कंबरेचा आकार ८० सेमी पेक्षा अधिक असेल आणि पुरुषांमध्ये त्याचे प्रमाण ९० पेक्षा अधिक असल्यास लठ्ठपणा असतो, असे म्हणता येईल.
- लठ्ठपणा परिणाम
- लठ्ठपणामुळे उदासीनता
- सामाजिक क्षेत्रात, शाळा, घराच्या परिसरात मित्र मैत्रिणींमध्ये सर्वत्र हीनवण्याची भावना तसेच अवहेलनेच्या परिणामास तोड दधावे लागते –
- दैनंदिन व्यवहारात चालणे, उठणे यांत अडचण
- जीना चढणे, बूट घालणे, चप्पल घालणे, वाकून काम करणे तसेच शारिरीक संबंधांनाही लठ्ठपणामुळे फार मोठी बाधा येते
लठ्ठपणामुळे आजारांचा धोका
- लठ्ठपणामुळे शरीरातील सर्व भागांवर ताण पडतो, त्यामुळे मधुमेह टाईप २ हा आजार आशिया खंडातील सर्वाधिक लोकांत दिसून येतो
- पायापासून डोक्यापर्यंत त्याचे परिणाम दिसून येतात. पायांना सूज येणे, शिरा फुगणे, तुटणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे, गुडघेदुखी, गुडघे झिजणे, घोट्याचे आवरण झिजणे
- मूत्रविसर्जनावरील नियंत्रण सुटणे
- यकृतामध्ये पित्ताचे खडे तयार होणे
- खूप श्रमाने मोठी धाप लागणे, दम लागणे, सतत निरुत्साह, थकवा जाणवणे
- घोरण्याचा आजार बळावणे
- हृदयविकाराचा धोका लहान वयात वाढणे,. अतिरक्तदाब वाढणे तसेच काही प्रकारचे कर्करोग वाढण्याचीही शक्यता अधिक असते.
- मित्रांनो यावरून तुम्हांला कळंलच असेल, लठ्ठ व्हायचे की मजबूत.